Sunday, 6 August 2017

महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटांना झेलावं लागतं,
पाण्याचा मोल कळण्यासाठी ,
दुष्काळात फिरावं लागतं .
स्वप्नात रंगण्यासाठी ,
निद्राधीन व्हावं लागतं . 
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी ,
प्रेमात पडावं लागतं .
त्याचप्रमाणे शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी ,
महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं.....
 महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं............



ajaypatil08.blogspot.com

shivbhaktajaypatil.blogspot.com

Saturday, 5 August 2017

पत्र शेवटचं लिहितो आहे


तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता...
लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे


ajaypatil08.blogspot.com
shivbhaktajaypatil.blogspot.com

दिल्लीचेही तख्त राखतो गर्जा महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवर कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जिवघेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
त्याच घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखतो अवघा महाराष्ट्र माझा

राजे पुन्हा जन्माला या

जन्म घ्या तुम्ही जन्म घ्या
राजे पुन्हा जन्माला या.......
शिरोशिरपेच हाथी समशेर शोभती
अश्वारूढ होयी राजा शिवछत्रपती
हे राजे तुम्हा हिंदू हृदय पुकारती
भगवा हाती धरून या
राजे पुन्हा जन्माला या

shivbhaktajaypatil.blogspot.com
ajaypatil08.blogspot.com

या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे

जय शिवराय......

अंधार होत चाललाय दिवा पाहिजे 
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
नेते झाले अफझलखान काश्मीरचे झाले स्मशान
शायिस्तेखानाची बोटं तोडण्यास युवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
मराठे झाले पैशांचे भक्त
मराठ्यांच्याच तलवारीला मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा स्वराज्यावर मराठ्यांचा दावा पाहिजे
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे
 शिवा

मर्द मराठा शिवबा होऊन गेला

जय शिवराय .......

विजेसारखी तलवार चालवून गेला
निधड्या छातीने हिंदूस्थान हलवून गेला
वाघनख्याने अफजलखानाचा
कोथळा फाडून गेला
स्वर्गात गेल्या वर देवांनी त्याला
झडून मुजरा केला
असा एक
मर्द मराठा शिवबा होऊन गेला
      शिवबा होऊन गेला.............


ajaypatil08.blogspot.com

shivbhaktajaypatil.blogspot.com

हिम्मत नाही कोणाची आज या महाराष्ट्राला हात लावण्याची

पाने चाळून पहा इतिहासाची
शपत होतीस्वराज्याची
घोषणा होती हर हर महादेवाची
थाप होती भवानी मातेची
तलवार होती शिवरायांची
साथ होती मावळ्यांची
म्हणून आता कोणाची हिम्मत नाही
या महाराष्ट्राला हात लावण्याची


shivbhaktajaypatil.blogspot.com

ajaypatil08.blogspot.com