Sunday, 6 August 2017

महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं

किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी
लाटांना झेलावं लागतं,
पाण्याचा मोल कळण्यासाठी ,
दुष्काळात फिरावं लागतं .
स्वप्नात रंगण्यासाठी ,
निद्राधीन व्हावं लागतं . 
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी ,
प्रेमात पडावं लागतं .
त्याचप्रमाणे शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी ,
महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं.....
 महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं............



ajaypatil08.blogspot.com

shivbhaktajaypatil.blogspot.com

No comments:

Post a Comment