Saturday, 5 August 2017

धोक्यात आहे मराठी

माता ज्यांची थोर जिजाऊ, शहाजी ज्यांचे पिता .
तो लढला ज्याच्यासाठी ती होती मराठी अस्मिता .
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी ,
तो संतापून पेठून उठला .
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडकला ,
तरूणांच्या हाती देऊन समशेर घडवला त्याने मावळा
स्वराज्य स्थापनेसाठी त्या शूर विरांनी सोसल्या लाखो कळा
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढून टाका सुरातून तानाजी
उठा अन शोधा स्वतःतच तोच मावळा
तोच शिवाजी
तोच शिवाजी

No comments:

Post a Comment